मनुदेवी मंदीरच्या फसवणूक प्रकरणातील महाराजास गावबंदीचे आदेश

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील ‘आडगाव’ येथील बाबा महाहंस यांच्याविरूध्द दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासाकामी महाहंस महाराजाचे मोठे भाऊ गोपाल शास्त्री यांना पोलिसांनी चौकशी संर्दभात नोटीस दिली. शास्त्री यांनी थेट जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली असता या अर्जावर निकाल देतांना न्यायालयाने शास्त्री यांना जामीन मंजूर करत गावात प्रवेशास बंदी केली आहे.

यावल तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री.क्षेत्र मनुदेवी मंदिराच्या जागेची आडगाव ग्रामपंचायतीच्या नमुना ८ मध्ये खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून नोंद करणे व नंतर त्या उताऱ्यावर चॅरिटेबल ट्रस्ट नोंदवून फसवणूक करण्याच्या गुन्ह्यात आडगाव तालुका यावल ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मार्तड पाटील उर्फ बाबा महाहंसजी महाराज यांना दि.३ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली होती.

या गुन्ह्याच्या तपासकामी यावल पोलिसांनी महाराजांचे मोठे भाऊ गोपाल मार्तंड पाटील उर्फ देव गोपाल शास्त्री यांना नोटीस दिली होती. महाराज यांनी थेट अटकपूर्व जामीनकरीता भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला. या जामीन अर्जावर निकाल देतांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.जाधव यांनी गोपाल शास्त्री यांचा जामीन मंजूर केला परंतु बाबा महाहंस सह गोपाल शास्त्री या दोघांनाही गावात येण्यास बंदी केली आहे. न्यायालयाने दिलेल्या गाव प्रवेशबंदीच्या आदेशामुळे बाबा महाहंसजी महाराज आणी त्यांचे मोठे बंधू गोपाळ शास्त्री यांच्या अडचणीत वाढ झाली आहे .

Protected Content