सिंधी कॉलनी येथील कापड व्यवसायिकाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव  लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | शहरातील सिंधी कॉलनी येथील कापड व्यावसायिकाने राहत्या घरात घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

सुरेशकुमार मिठूमल मताना (वय ५०) रा. सिंधी कॉलनी असे मयत कापड व्यावसायिकाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेशकुमार मताना हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. फुले मार्केट परिसरात कपडे विकून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री कुटुंबियासोबत जेवण करून झोपले. मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आली. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत माहिती मिळाली नाही. नातेवाईकांनी मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. त्यांच्या पश्‍चात पत्नी कमला, मुलगा दीपक, सुन हीर, नात यशीका असा परिवार आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अच्छा यांनी दिलेल्या खबरीवरुन एमआयडीसी  पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास सचिन मुंढे हे करीत आहे.

Protected Content