स्व.बाळासाहेब चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनाजी महाविद्यालयात कार्यक्रम

balasaheb chaudhari

फैजपूर प्रतिनिधी । शिक्षण महर्षी म्हणून ज्यांची ओळख असलेले स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांची 9 व्या पुण्यतिथी निमित्त येत्या सोमवारी (दि. 8 जुलै) रोजी धनाजी नाना महाविद्यालयामध्ये दुपारी 12 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जसे राजकारणात अनेक नेते समाजकारण विसरून जाता. पंरतू बाळासाहेब यांनी कधी राजकारण केले नाही. त्यांनी पूर्ण आयुष्य समाजकारणात स्वतःला वाहून घेतलेले होते. तसेच यावल, रावेर तालुक्यात हरितक्रांति आणून या भागातील शेतकऱ्यांना जिल्ह्यात नव्हे, तर होणार राज्यात यात एक-एक नवीन ओळख निर्माण करून देण्याचे काम स्वर्गीय बाळासाहेब यांनी केले होते. तसेच यावल, रावेर तालुक्यातील भाग पाण्याखाली आणण्याचे काम त्याकाळी बाळासाहेब यांनी केले होते. अनेक धरणे व बंधारे बांधून देण्यात आले होते. या महान नेत्याची 9वी पुण्यतिथी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याकार्यक्रम दरम्यान लोकसेवक बाळासाहेब तथा मधुकरराव चौधरी यांच्या ९ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार दि.८ जुलै मा. बाळासाहेबांच्या जीवनकार्यावर व्याख्यान, वक्ते, प्रसिध्द विचारवंत मा.सुरेश व्दादशीवार, नागपूर ज्येष्ठ समाजकार्यकर्ते मा.सूर्यकांत कुलकर्णी, स्वप्नभूमी परभणी याचवेळी लेखक व शिक्षक दिलीप वैद्य लिखित गोष्टीरुप लोकसेवक मधुकरराव चौधरी या पुस्तकाचे विमोचन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.शिरीष चौधरी भूषविणार आहेत. तरी स्व बाळासाहेब चौधरी यांच्यावर प्रेम करणारे ज्येष्ठ, हितचिंतक, तरुण मंडळी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन मधुस्नेह परिवार खिरोदा यांनी केले आहे.

Protected Content