उंटावद ग्रामपंचायतीत वीरयोद्धा एकलव्याची जयंती उत्साहात

*यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील उंटावद ग्रामपंचायतीच्या कार्यालयात वीरयोद्धा एकलव्य यांची जयंती ग्रामस्थांच्या वतीने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरी करण्यात आली.

वीरयोद्धा एकलव्य यांच्या जयंती निमीत्ताने उंटावद ग्रामपंचायतीत ग्रामस्थांच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सायंकाळच्या सुमारास उंटावद गावातुन मिरवणूक काढण्यात आली. व घरोघरी वीरयोद्धा एकलव्य यांच्या प्रतिमेची पुजा आरती करण्यात आली.

यावेळी सरपंच छोटू भगवान भिल, उंटावद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन शशीकांत गुलाबराव पाटील, ग्रांम पंचायत सदस्य डिगंबर धना सपकाळे, तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष रामचंन्द्र वामण सपकाळे, अनिल राजधर पाटील, अनिल यशवंत पाटील, माजी ग्रा.प.सदस्य रमेश सदा भिल, शिवदास दोधू कोळी, मैभुब झिपरू तडवी, ग्रां.प.लिपीक दत्तात्रय ताराचंद पाटील, गुलाब सायबू तडवी, सुनिल चिंतामण कोळी, मेहरबान झिपरू तडवी, बापू धनराज भिल, गजानन रघुनाथ भिल, अनिल निंबा भिल, श्याम प्रमोद भिल, अंकुश भिवराज भिल, सुरेश चैत्राम सपकाळे यांच्यासह ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येत उपस्थीत होती.

Protected Content