एन.एन.वाईन दारूच्या दुकानाचा परवाना रद्द करा; रिपाइंचे निवेदन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गुजराल पेट्रोलपंप जवळील एन.एसन. वाईन दुकानाचा परवाना रद्द करावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाला बुधवार २ मार्च रोजी दुपारी निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ जळगाव संचलित श्री स्वामी समर्थ शिष्य विकास प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर ही शाळा शंकर प्लाझा, गुजराल पेट्रोल पंपाशेजारी आहे. शाळेच्याच खाली एन.एन. वाईन हे दारू विक्रीचे दुकान आहे.  दारू विक्रीच्या दुकानात परवाना देताना नियमांचे उल्लंघन झालेले आहे. त्यामुळे दारूच्या दुकानामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट संस्कार होत आहे व त्यामुळे पालक त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे एन.एन. वाईन या दुकानाचा दारूचा परवाना त्वरित रद्द करावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आले आहे. या निवेदनावर रिपाईचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, युवक जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, शहर संघटक किरण अडकमोल, शहर प्रसिद्धीप्रमुख बबलू भालेराव आणि शहर सचिव अनिल लोंढे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

Protected Content