भुसावळ प्रतिनिधी । भोरगाव लेवा पंचायतच्या भुसावळ विभागतर्फे पुनर्विवाहोत्सुक घटस्फोटित, विधवा, विधूर तसेच प्रौढ, अपंग, शेतकरी आणि व्यावसायिक युवक, युवतींची परिचय पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यात नाव नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.
लेवा पाटीदार समाजातील विवाहोत्सुक वधु-वरांचे परिचय संमेलन भुसावळात होणार आहे. समाजातील घटस्फोटीत, विधवा व अंपगांचे विवाह जुळण्यास अडचणी येतात. त्यासाठी भोरगाव लेवा पाटीदार पंचायतीच्या माध्यमातून असे विवाह जुळवून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लवकरच पुस्तिका तयार केली जाणार असून, समाजातील पुर्नविवाहोत्सुकांसाठी परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी परिचय पुस्तीका तयार करण्यात येत आहे. या वर्षीचे पुस्तिका निर्मितीचे सलग नववे वर्ष असून यात विनामूल्य नावनोंदणी करावी, असे आवाहन प्रकल्प प्रमुख आरती चौधरी यांनी केले आहे.
समाजातील इच्छुकांनी विनामूल्य नाव नोंदणीसाठी पुरुषोत्तम मेडिकल, मामा पाचपांडे पान सेंटर, किंवा जामनेर रोडवरील भोरगाव लेवा पंचायत कार्यालयात नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.