मुंबई वृत्तसंस्था । महापरिक्षा पोर्टलसंदर्भात अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून अनेक गंभीर आक्षेत नोंदविण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत सर्व परीक्षांना स्थगिती देण्यात आली असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. तसेच पुढील आठवड्यात होणाऱ्या पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापरीक्षा पोर्टलबाबत अनेक तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयात प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान विभागाने आढावा बैठक आयोजित केली होती. त्याच पार्श्वभूमीवर महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येणार आहे. यात राज्य शासनाच्या विविध विभागातील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत चर्चा करण्यात आली. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धती बाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रार धारकांसोबत येत्या आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तसेच पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर पदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. या त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात येईल.
दरम्यान काही दिवसांपूर्वी महापरीक्षा पोर्टल बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली होती. “स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांमधून महापरीक्षा पोर्टल रद्द झाले पाहिजे ही मागणी सातत्याने पुढे येत आहे. पुन्हा एमपीएससी किंवा सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून पारदर्शिपणे या जागांची भरती व्हावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची होती.