पाचोरा कन्या विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली

9086e4bb 0b3c 4997 9bb4 d213db90135c

 

पाचोरा (प्रतिनिधी) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका प्रा. संगीता राजपूत अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी उपस्थित शिक्षकांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी प्राचार्य संजय पवार, प्रा. रवींद्र चव्हाण, के. ट.भारुळे, शिवाजी शिंदे, ज्येष्ठ लिपिक भागवतराव चौधरी , हिरालाल परदेशी, प्रतिभा परदेशी, प्रा अंकिता देशमुख , प्रतिभा पाटील, प्रा सपकाळे, विजय पाटील,राकेश पगार तसेच विद्यालयातील विविध वर्ग प्रतिनिधी उपस्थित होते.

Protected Content