Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. आर. व्ही. पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्ताने सत्कार

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. आर. व्ही. पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्ताने सत्कार

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील प्रा. आर. व्ही. पाटील सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने विभागाच्या वतीने एका सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सरांना सुंदर मोमेंटो व शाल प्रदान करून अत्यंत सन्मानपूर्वक गौरविण्यात आले आणि त्यांना भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रा. आर. व्ही. पाटील सर यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात महाविद्यालयाच्या तसेच गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. ज्ञानदानाप्रती असलेली त्यांची निष्ठा, विद्यार्थ्यांप्रती असलेली जिव्हाळ्याची आत्मीयता आणि सहकाऱ्यांशी असलेले सलोख्याचे संबंध यांमुळे त्यांनी सर्वच स्तरावर आदराचे आणि अतुट स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या खडतर व प्रेरणादायी प्रवासाचा उपस्थितांनी गौरव केला.
या विशेष प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय डॉ. उल्हास पाटील, सचिव आदरणीय डॉ. वर्षा पाटील, संचालिका आदरणीय डॉ. केतकी पाटील, संचालक आदरणीय डॉ. वैभव पाटील, संचालक आदरणीय डॉ. अनिकेत पाटील व संचालिका डॉ. अक्षदा पाटील यांनी प्रा. आर. व्ही. पाटील सर यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि सुखी सेवानिवृत्तीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाप्रसंगी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. व्ही. एच. पाटील, तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख आदरणीय डॉ. हेमंत इंगळे, विभागातील प्राध्यापक डॉ. ईश्वर जाधव, डॉ. व्ही. डी. चौधरी, डॉ. देवेंद्र मराठे व प्रा. हेमराज धांडे यांच्यासह महाविद्यालयातील इतर विविध विभागांचे विभागप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रा. आर. व्ही. पाटील सर यांच्या संस्थेप्रती असलेल्या अखंड योगदानाचे मुक्तकंठने कौतुक केले. तसेच त्यांच्या पुढील आयुष्याला उत्तम आरोग्य, आनंद, मानसिक समाधान आणि भरभराट लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. नोकरीतून मिळणारी सेवानिवृत्ती हा कोणत्याही प्रवासाचा शेवट नसून, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ देत आयुष्याच्या एका नव्या पर्वाची ती सुंदर सुरुवात असते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सरांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून आणि कर्तृत्वातून निर्माण केलेला आदर्श तरुण पिढीसाठी सदैव प्रेरणादायी ठरणार आहे.


Protected Content

Play sound