‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ इफेक्ट : गंडवलेल्या चौघं तरुणांचे पैसे परत

2914a775 50f5 4a03 a42e 2aef9d97c998

 

जळगाव (प्रतिनिधी) सैन्याच्या कॅन्टीनमध्ये नौकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका कंपनीने सोलापूरच्या चार तरुणांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला होता. आज सकाळी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने पिडीत तरुणांसोबत थेट कंपनीच्या कार्यालयाबाहेरून ‘फेसबूक लाईव्ह’ केले होते. दरम्यान, सोशल मीडियात पडसाद उमटताच कंपनीने चौघं तरुणांचे पैसे परत केले आहेत. या प्रकरणात पिडीत तरुणांच्या पाठीमागे उभे राहणारे नगरसेवक प्रवीण कोल्हे यांनी फोन करून यासंदर्भात ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ला माहिती देत आभार मानले.

 

या संदर्भात अधिक असे की, जळगावातील खेडी परिसरात मूळ दिल्लीची असलेली ग्लेझ नामक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कार्यरत आहे. या कंपनीची नारायणी अॅसेट नामक उपशाखेने आम्हाला सैन्याच्या कॅन्टीनमध्ये नौकरी लावून देण्याच्या बहाण्याने गंडविल्याचा आरोप सोलापूर येथील चार तरुणांनी केला होता. अक्षय सदाशिव शेडगे, गणेश महादेव काकडे,प्रतिक वसंत साळुंखे, सागर वंसत सोनमुळे (चौघं. रा. माळशिरस जि.सोलापूर) या तरुणांना सैन्याच्या कॅन्टीनमध्ये नौकरी लावून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासाठी प्रत्येकाकडून १२ हजार रुपये घेऊन आणखी लोकांना कंपनीसोबत जोडल्यास गुण वाढतील व तुम्हाला आर्थिक फायदा होईल, असे सांगण्यात आले होते.

 

नौकरी लावून देतांना या तरुणांना तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल. एवढेच नव्हे, तर राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कंपनी करेल, असे सांगण्यात आले होते. परंतू मागील तीन महिन्यापासून या चौघं तरुणांना घराच्या बाहेर सुद्धा निघू देण्यात आले नव्हते. या तरुणांना मार्केटिंगचे काम देण्यात आले होते. मागील आठ दिवसापासून हे चौघं तरुणांना जेवण सुद्धा देण्यात आले नव्हते. त्यामुळे ही मुलं उपाशी राहत होती. इकडून तिकडून पैसे जळवून त्यांनी बिस्किटांवर दिवस काढले. मात्र, त्रास असह्य झाल्यावर त्यांनी खेडी प्रभागातील नगरसेवक प्रवीण कोल्हे यांच्याशी संपर्क साधला. श्री. कोल्हे यांनी या तरुणांच्या जेवणाची व्यवस्था केली. तसेच कंपनीचे सुपरव्हायझर श्री. पंडित यांच्यासोबत भेट घेत. तरुणांचे पैसे परत करण्याची विनंती केली. अखेर ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ ने ‘फेसबूक लाईव्ह’ करताच कंपनीचे उपशाखेचे प्रमुख श्री. पंडित यांनी संबंधित तरुणांचे पैसे परत केले आहेत. दरम्यान, या तरुणांचे पूर्ण पैसे परत झाले नसून मूळ रकमेतून ३० टक्के रक्कम कापून देण्यात आल्याचे कळते.

Protected Content