बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गवर जीवघेणे खड्डे

19ff8da7 d302 4254 8dde 07a549b060e5

 

चोपडा( प्रतिनिधी) तालुक्यातील गलंगी जवळील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गवर फॉरेस्ट नाक्याजवळ जीवघेणी खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे वाहन धारक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

 

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गवर फॉरेस्ट नाक्याजवळ एवढे मोठमोठे खड्डे पडले आहेत. तरी बांधकाम विभागाचे डोळे झाक सुरूच आहे. बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष दयावे, अशी मागणी होत आहे. या मार्गाने रोजच हजारो वाहनांची वर्दळ चालू असते. चौफूली असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रामानावर असते. प्रवाशांची ये-जा ही जास्त असते. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजूबाजूला हाॅटेल व्यावसायिक आहेत.अगदी त्याचा जीवावर देखील मोठे संकट येऊ शकते. कोणतेही वाहन हे भरधाव वेगाने येत असते. वाहन धारकांना या खड्डयाचा अंदाज येत नसल्याने मागेही किरकोळ अपघात झाले आहेत. तेवढा परिसर वाहनधारकांना काढणे अगदी कसरतीचे जाते. पुढील अनर्थ टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन काम करून करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

Protected Content