वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील यावल रोड लगत बापूजी कॉम्प्लेक्स येवून अवैध्यरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर चोपडा शहर पोलीसांनी पकडले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

चोपडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसान, चोपडा शहरातील यावल रोड लगत बापूजी कॉम्प्लेक्स येवून अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सुचना पोलीस पथकाला दिल्या. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शिवाजी धुमाळ, पोलीस नाईक संतोष पारधी यांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीझेड ६५१७) व विना क्रमांकाची ट्रॉली पकडली. याप्रकरणी पोलीस नाईक शिवाजी धुमाळ यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कुंदन कमलाकर कोळी आणि काशिनाथ रामी कोळी दोन्ही रा. कोळंबा ता. चोपडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष पारधी करीत आहे.

 

Protected Content