दहिगाव येथे संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित अन्नदान

66be2ae9 fce9 4673 8c77 14787d8fcbd6

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील सालाबादप्रमाणे यावर्षीही माळी समाज बांधवांच्या वतीने संत शिरोमणी श्री सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने गावातील आदर्श विद्यालयाच्या प्रांगणावर अन्नदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी श्री संत सावता माळी यांच्या प्रतिमेची पूजा-अर्चना करून माळी समाज संघटनेचे अध्यक्ष दगडू देवराम माळी यांच्या हस्ते करण्यात येवुन त्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी येथील ग्रामपंचायतीचे सदस्य पी.डी. चौधरी, मच्छिंद्र चौधरी, प्रदीप माळी, योगेश माळी मधुकर माळी, मधुकर माळी, सागर माळी, प्रभाकर महाजन, नितिन महाजन, जनार्दन महाजन, भरत चौधरी, रतिलाल महाजन, प्रल्हाद चौधरी, साहेबराव माळी यांच्यासह अनेक समाज बांधव व सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content