फुले दाम्पत्य सन्मान दिवस  गावागावात उत्सहात साजरा करा –सचिन गुलदगड 

 

चोपडा, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे ‘१ जानेवारीला आयोजित फुले दाम्पत्य सन्मान दिवस महारॅली’ स्थगित करण्यात आली असून स्थानिक कार्यकर्त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय वापरून प्रातिनिधिक स्वरुपात भिडे वाडा व फुले वाडा येथे जाऊन अभिवादन करावे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले आहे.

१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा जोतीराव फुले व माता सावित्रीआई फुले यांनी पहिली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे येथे सुरू केली होती. याचे औचित्य साधून पुणे येथे दरवर्षी ‘१ जानेवारी फुले दांम्पत्य सन्मान दिवस महारॅली’चे आयोजन करण्यात येते, मात्र यावर्षी आयोजकांना या रॅलीस स्थगीत करावी लागली व प्रातिनिधीक स्वरूपात स्थानिक कार्यकर्त्यांनी भिडेवाडा व फुलेवाडा येथे जाऊन वंदन करता येणार आहे. राज्यातील इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्थानीक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजून हा उत्सव साजरा करावा असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले आहे.

महारॅली स्थगीत करण्यात आल्याने  गावागावात स्थानिक ठिकाणी हा उत्सव दिवस साजरा करण्यात येणार आहे. यात १ जानेवारी फुलेदांम्पत्य सन्मान दिन ते ३ जानेवारी माता सावित्री फुले जन्मदिन ( महिला शिक्षक दिन) त्रीदिवसीय सप्ताहाचे आयोजन करावे. या सप्ताहामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमाच्या अधिन राहुन रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच इतर ऊपक्रम राबविण्यात येणार आहे. घरासमोर रांगोळी काढावी व शक्य असल्यास घरावर रोषणाई करावी. तसेच मुख्य चौकात मिठाई वाटप करावी असे आवाहन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले आहे.

Protected Content