तरुणांनी कम्युनिस्ट विचार सरणीचाही अभ्यास करावा– कॉम्रेड  अमृतराव महाजन

 

चोपडा, प्रतिनिधी । येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ९५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बस स्थानक समोर नवीन तयार करण्यात आलेल्या कार्यालयात पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ९५ व्या स्थापना दिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थानी किसान सभेचे चोपडा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील धनवाडी हे होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड अमृतराव महाजन यांनी तरुणांना आवाहन केले की , कम्युनिस्ट पक्षाचां इतिहास त्याग संघर्ष बलिदानाचा आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग राहिला आहे. भगतसिंग, शाहू, फुले, आंबेडकर विचारांशी असलेली बांधिलकी आणि कामगार, शेतकरी, शेतमजूर, यांच्या शोषणाविरुद्ध आहे सांगुन समाजवादासाठी चाललेल्या लढाईवर निष्ठा ठेवणे म्हणजेच पुरोगामी होय. तरुणांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष साम्यवादी विचारसरणीचा देखील अभ्यास करावा असे आवाहन केले. कार्यालयासमोर पक्षाचा लाल झेंडा फडकविण्यात आला या अभिवादन कार्यक्रमात वासुदेव कोळी, काळू पारधी, सोपान पाटील, चिंतामण मगरे, फिरोज खान, शत्रुघ्न सपकाळे, शेख असलम, सुनील पाटील, दीपक पाटील, पंकज महाजन, भरत शेट्टी तसेच अनेक भाकप हितचिंतक उपस्थित होते.

Protected Content