प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कर्तृत्ववान महिलांचे मुलाखतीद्वारे जाणले अंतरंग

 

जळगाव, प्रतिनिधी ।  येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा , वाघ नगर येथे जागतिक महिला दिन यावर्षी ऑनलाइन स्वरूपात साजरा करण्यात आला. या ८ मार्चचे औचित्य साधून  विविध क्षेत्रातील ८ कर्तृत्ववान पालक महिलांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेऊन त्यांची कार्यप्रणाली जाणून घेत आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला.  

मुलाखत इयत्ता – २ री , ३ री व ४ थीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नावलीच्या स्वरूपात घेतली.  त्या ज्या  क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्राची माहिती, काम करीत असताना आलेले अनुभव, अडचणी, त्यांचे प्रेरणास्थान,  त्यांनी आतापर्यंत राबविलेले उपक्रम, अजून या क्षेत्रांमध्ये काय काय करण्याची भविष्यात त्यांची तयारी आहे याबाबत मुखातीद्वारे स्पष्ट केले.   या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व महिला कर्तुत्ववान पालकांनी सहभाग नोंदविला त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत .

तन्वी गोपाळ पाटील या विद्यार्थिनीने  शिल्पा राजेंद्र गाडगीळ ( ग्रंथपाल ) यांची मुलाखत घेतली . . उपासना संदीप राणे हिने रविषा सत्यानंद शिसोदे (शिक्षिका ) यांची मुलाखत घेतली. मयुरी निलेश पाटील हिने सारिका मयूर नरवाडे ( डॉक्टर / अध्यापक ) यांची मुलाखत घेतली. उत्तरा अविनाश खलसे हिने कविता भूपेंद्र पाटील ( ताई मेस )  यांची मुलाखत घेतली.  आदित्य मनोज पाटील याने प्राजक्ता सचिन गडकरी (परिचारीका ) यांची मुलाखत घेतली. अनुष्का योगेश शेवकर हिने  ममता सुनील जाधव ( शिवणकाम ) यांची मुलाखत घेतली.  ग्रिष्मा नितीन रामकुवर हिने रेखा सुभाष पाटील ( समाजसेविका ) यांची मुलाखत घेतली.  पियुष राकेश पाटील याने रुपाली प्रशांत बडगुजर ( धान्य विकी व्यवसाय ) यांची मुलाखत घेतली. सिद्धी सचिन कुलकर्णी हिने अश्विनी विजय पाटील यांची मुलाखत घेतली.

 परंतु या महिला  विविध क्षेत्रात कार्य करीत असल्यामुळे यांना रविवारी सुट्टी असल्याकारणामुळे आपण हा कार्यक्रम 7 मार्च रोजी साजरा केला. या कार्यक्रमात शिल्पा गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांना वाचन का करावे? वाचनाचे महत्व, वाचनानंतर काय करावे?याविषयी मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाचे नियोजन कुमुद कुरकुरे दीदींनी केले. या कार्यक्रमाला विशेष असे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील व  समन्वयिका जयश्री वंडोळे दीदी यांचे मिळाले. 

Protected Content