Home क्राईम आदिवासी महिलेवर अत्याचार करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

आदिवासी महिलेवर अत्याचार करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

0
30


यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या एका आदिवासी महिलेवर अत्याचार करणाऱ्या विरोधात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत क्षेत्रात लसुन बर्डी येथील राहणारा संशयीत आरोपी लकडा गणपत बारेला याने एका (४०वर्षच्या) महीलेशी सुमारे २०२० मध्ये वेळ माहीत नाही. दि. १५ मार्च २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लसुन बर्डी येथे फिर्यादी महीलेच्या राहत्या घरी ओळख निर्माण करून माझेवर माझ्या संमतीविना जबरदस्तीने शारिरिक संबंध करून मला सोबत घेवुन जावुन मला धानोराच्या जंगलात सोडुन दिले. व मी शारिरिक संबंधास नकार देत होती म्हणुन त्याने मला कोणास सांगु नको नाहीतर तुला जीवे ठार मारेल अशी धमकी दिली. म्हणुन पिडीत महीलेने यावल पोलीसात फिर्याद दिल्याने संशयीत आरोपी लकडा गणपत बारेला याच्या विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन , गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस उपनिरिक्षक अजमल आय पठाण हे करीत आहे. 

 


Protected Content

Play sound