पाचोरा येथे महिला दिन उत्साहात साजरा

पाचोरा प्रतिनिधी । महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांचे आदेशित पाचोरा येथे तालुका विधी सेवा समिती आणि पाचोरा वकिल संघ यांचेमार्फत जागतिक महिला दिवस नुकताच पाचोरा न्यायालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. भिखु पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. सुनिता गुंजाळ मांडोळे हया होत्या. याप्रसंगी कार्यक्रमाला तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायीक अधिकारी एफ. के. सिद्दीकी, सह दिवाणी न्यायाधीश एम. एच. हक, २ रे सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बडगुजर, पाचोरा वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. प्रविण पाटील, उपाध्यक्ष ॲड. अरुण भोई तसेच वरिष्ठ व कनिष्ठ वकिल मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ॲड. संध्या सांळुखे यांच्या प्रास्ताविकाद्वारे झाली. यानंतर आलेल्या पाहुण्यांमध्ये प्रा. सुनिता गुंजाळ, ॲड. भिखु पाटील, ॲड. मनिषा पवार, ॲड. कल्पना खेडकर, ॲड. त्रिशिला

लोंढे, ॲड. भाग्यश्री महाजन, ॲड. संध्या सांळुखे तसेच सहा. अधिक्षक सविता जाधव यांचा गुलाब पुष्प देवुनसत्कार करण्यात आला. यावेळी तालुका विधी सेवा समिती तर्फे आयोजित शिबीरा अतंर्गत कौटुंबिक हिंसाचारा पासुन महिलांचे संरक्षण या विषयावर ॲड. कल्पना खेडकर यांनी आपले विचार मांडले. तसेच मनोधैर्य योजना या विषयावर ॲड. त्रिशिला लोंढे यांनी तर महिलांचे लैगींक शोषण या विषयावर ॲड. भाग्यश्री महाजन यांनी तसेच असंघटीत कामगार सेक्टर या विषयावर ॲड. मनिषा पवार यांनी विचार व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे म्हणुन बोलतांना प्रा. गुंजाळ म्हणाल्या की, आजही भारतात पुरुष प्रधान संस्कृती असुन महिलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. महिलांचे आयुष्य हे परावलंबी दिसुन येते. तसेच स्री – पुरुष समानता दिसुन येत नाही. ती राबवली गेली पाहिजे. आजची स्त्री ही विकास प्रक्रीयेपासुन वंचित दिसुन येत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिला अनिष्ट रूढी, परंपरा, चालीरीती मध्ये बंदिस्त झालेल्या बघावयास मिळत आहे. भारत हा स्री प्रधान देश म्हणून ओळखला जातो. कारण आपल्या देशात अर्थांजन करणारी स्त्री दिसते. परंतु हे करीत असताना महिलांना आपली सुरक्षा स्वत: करावी लागते. असे मत यावेळी प्रा. सुनिता गुजांळ यांनी मांडले.

कार्यक्रमाचे शेवटी अध्यक्षा ॲड. भिकु पाटील यांनी हुंडाबळी कायदे या विषयावर आपले विचार मांडले. याप्रसंगी तालुका विधी सेवा समितीतर्फे प्रमुख उपस्थित, वकील बांधव, पक्षकार, वकील संघ यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ सहाय्यक बी. एम. भोसले, कनिष्ठ सहाय्यक डी. के. तायडे यांचे सह न्यायालयीन कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Protected Content