तलाठ्यांच्या बदल्या पारदर्शकपणे करा – दीपककुमार गुप्ता यांची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव विभागातील तलाठी कर्मचारी यांची बदली प्रक्रिया राबवितांना व्हिडीओ शुटींगच्या माध्यमातून करण्यात यावे, जेणे करून बदल्या करण्यासाठी होणार भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशा मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जळगाव विभागाचे उपविभागीय महसूल अधिकारी महेश सुधालकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नियताकालीन सर्वसाधारण तलाठी बदल्या २०२२ या वर्षांतील बदल्या करण्याच्या हालचाली सुरू झाले आहे. बदली प्रक्रिया पारदर्शक राबविण्यात यावी. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गेल्या महिन्या मंडळाधिकारी, अव्वल कारकून व वाहन चालक यांच्या बदल्या केल्या. त्यावेळी बदली प्रक्रिया राबविण्यात येत असतांना जिल्हाधिकारी यांनी व्हिडीओ शुटींग करण्यात येवून प्रक्रीया यशस्वी आणि आदर्श पध्दतीने राबविली. त्याच अनुषंगाने तलाठी बदली प्रक्रिया राबवितांना व्हिडीओ शुटींग करून राबविण्यात यावी, जेणे करून बदली करतांना कोणताही भ्रष्टाचार होणार नाही व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल. असे निवेदन महिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जळगाव विभागाचे उपविभागीय महसूल अधिकारी महेश सुधालकर यांना दिले आहे.

Protected Content