Home आरोग्य पहूर ग्रामीण रूग्णालयास आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे यांची भेट

पहूर ग्रामीण रूग्णालयास आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे यांची भेट

0
158


पहूर  ता. जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पहूर पेठ, पहूर कसबे परिसरात सुद्धा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच गेल्या तीन दिवसात ३ मृत्यूंची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी पहूर येथे भेट दिली. 

पहुर येथे आज वैद्यकीय पथकाने डॉ.जितेंद्र जाधव व डॉ. जितेंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण केले व संशीयितांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. पेठ व कसबे दोन्ही ग्रामपंचायतीच्या व लोकप्रतिनिधींच्या मदतीने सर्व व्यावसायिक दुकानदार, खाजगी डॉक्टर त्यांच्या दवाखान्यात काम करणारे व्यक्ती,खाजगी व सरकारी दवाखान्यात येणारे सर्व रुग्ण,भाजीपाला विक्रेते,सलून दुकानदार इ.ची कोरोना चाचणी रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता दररोज ग्रामीण रुग्णालय पहूर येथे दुपारी बारा वाजता करण्यात येणार आहे.कोरोना चाचणी केल्यानंतर च त्यांना व्यवसाय परवानगी देण्यात येणार आहे.

पहूर येथील एक खाजगी डॉक्टर यांनी पॉझिटिव्ह आल्यानंतर ही रुग्ण तपासणी केल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी यांना मिळाली त्यानुसार त्यांनी चौकशीचे आदेश दिले.जर अशी घटना खरोखरच घडली असेल तर संबंधित डॉक्टरांचे नाव मा.जिल्हाधिकारी यांना कळवून त्यांच्या विरोधात साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असे डॉ.राजेश सोनवणे यांनी सांगितले.

तसेच नागरिकांनी मास्क , सॅनिटायझर,  वारंवार हात धुणे,गर्दी न करता एकमेकांपासून अंतर ठेवावे, व किरकोळ आजाराची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून पुढील उपचार करावे म्हणजे रुग्णाचा धोका कमी होतो असे त्यांनी सांगितले.ग्रामीण रुग्णालय पहूर येथे लवकरच कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत मा. जिल्हाशल्य चिकित्सक यांना कळवण्यात येणार असल्याचे सांगितले.

 


Protected Content

Play sound