फैजपूर येथे ग्रामीण रुग्णालयाला तत्वतः मान्यता

hqdefault

रावेर/फैजपूर (प्रतिनिधी) मंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार हरिभाऊ जावळे यांनी फैजपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केली आहे. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी तत्त्वतः मान्य करून प्रधान सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

फैजपूर शहरालगत मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्ती वाडे आहेत आणि त्यामुळे अनेक वर्षांपासून फैजपूर वासीयांची ग्रामीण रुग्णालयाची मागणी आहे. अंकलेश्वर-बरहाणपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून अपग्रेड व्हावा, त्यासोबत फैजपूर, पुनखेडा-पांतोंडी, सुकी नदीवरील वडगाव येथील हे तीनही पूल जीर्ण झालेले आहेत, या प्रत्येक पुलासाठी सुमारे ८ ते ९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, तेव्हा या पुलाना मंजुरी मिळावी. मध्यप्रदेश सीमेवरून येणारा रस्ता पाडला, नेरूळ, खानापूर या रस्त्यालामंजुरी मिळावी., हा केळीचा भाग असल्यामुळे या रस्तावरून मोठ्या प्रमाणत वाहतूक सुरु असते. रस्त्याच्या कामांना उशीर करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका.

कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी मिळणारी वीज ९ रु. युनिट एवजी २ रु. युनिट मिळावी. पाटबंधारे आणि ग्राम पंचायत जागेमध्ये पाल, बामणोद, खिरोदा आणि वनोली येथे १० मेगा वॅटचा सोलर प्रकल्प प्रस्ताव मंजूर करून सुरु करावा .या सोबतच चिनावल, पातोंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे पूर्ण करून हस्तांतर करावे, या सोबतच ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा त्वरित भराव्यात. या मागण्या आ. जावळे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडल्या आहेत.
याशिवाय मराठा आणि आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण सोयीचे आणि सुलभ व्हावे या करीता यावल, रावेर आणि फैजपूर या ठिकाणी वसतिगृहे असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे या तीनही ठिकाणे मराठा आणि आदिवासी समाजातील गरीब विध्यार्थ्यांसाठी वासातेगृह बांधावी, अशी मागणीही आ. जावळे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे केली आहे.

Protected Content