वरखेडे-लोंढे प्रकल्पावर आधुनिक टेलीबेल्ट मशिन दाखल

7e98501a 7295 407b 815c eb2d3c308923

चाळीसगाव, प्रतिनिधी | सुमारे साडे पस्तीस दशलक्ष घनमीटर पाण्याची साठवण क्षमता असलेला, चाळीसगाव तालुक्यातील २० व भडगाव तालुक्यातील ११ गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच या क्षेत्रातील ७५४२ हेक्टर जमिनीला जलसिंचनाचा फायदा देणारा आधुनिक पद्धतीने साकारल्या जाणाऱ्या वरखेडे लोंढे बँरेज प्रकल्पावर टेलीबेल्ट या अत्यंत आधुनिक मशीनच्या सहाय्याने उर्वरित कॉंक्रिटीकरणाला सुरुवात होणार असल्याने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात वरखेडे लोंढे बँरेजच्या जलसिंचनाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार असल्याने समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

 

चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे गिरणा नदीवर असलेल्या वरखेडे लोंढे बँरेजच्या कामाला गेल्या अनेक महिन्यांपासून रात्रंदिवस काम सुरू आहे. या ठिकाणी गेल्या सप्ताहात अत्याधुनिक कंपनीचे टेलीबेल्ट नावाचे ५० मिटर दूरवर तसेच खोलवर कॉंक्रीटीकरण करणारे आधुनिक मशीन आल्याने कॉंक्रिटीकरण अत्यंत गुणवत्तापूर्वक केले जाणार असल्याने कामास गती मिळणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

या प्रकल्पामुळे उपखेड, वरखेड, सेवानगर, पिलखोड, तामसवाडी या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील २५ हुन अधिक गावांना त्याचा फायदा होणार आहे. याचा पाठपुरावा खा.पाटील यांनी वेळोवेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केल्याने हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे.

Protected Content