शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी तयार राहावे : शेतकरी कृती समितीचे आवाहन

morcha

चाळीसगाव, प्रतिनिधी | ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी तयार राहावे, असे आवाहन शेतकरी कृती समितीचे विवेक रणदिवे समाधान सूर्यवंशी रवींद्र पांगारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आर.के. पाटील यांनी केले आहे.

 

त्यांनी म्हटले आहे की, आधी नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी करणारे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र आता ते सत्तेवर आल्यावर त्यांना त्यांच्याच मागणीचा विसर पडला आहे. सरसकट सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीनेही मागील सरकारप्रमाणेच पुन्हा अटी-शर्ती लागू करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बांधवांनी आंदोलनासाठी तयार राहावे, असे त्यांनी म्हटले आहे.

Protected Content