भुसावळ येथे जागतिक एड्स सप्ताह उत्साहात

भुसावळ, प्रतिनिधी | येथील पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसाठी आज जागतिक एड्स सप्ताह उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध तज्ज्ञांनी एड्सवर मार्गदर्शन केले.

भुसावळ येथील पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात जागतिक एड्स दिन सप्ताह आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी ज्योती गुरव यांनी एच.आय. व्ही /एड्स या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही होण्याची कारणे तसेच एच.आय. व्ही /एड्स वर उपलब्ध असलेली औषधे या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर गुप्तरोग , लैंगिक आजार, टी.बी इत्यादी विषयावर सुद्धा मार्गदर्शन केले. त्यानंतर एच. आय. व्ही/ एड्स जनजागृतीवर विद्यार्थ्यांना शपथ देण्यत आले. एच.आय. व्ही/एड्स जनजागृतीपर पोस्टर प्रदर्शन ही लावण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देऊन विद्यार्थ्यांच्या समज-गैरसमज ज्योती गुरव यांनी दूर केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी , एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर एस नाडेकर, महिला कार्यक्रम अधिकारी ममता बेन पाटील व भावना प्रजापति आदी उपस्थित होते. तत्पूर्वी प्रा. डॉ. ममता बेन पाटील यांनी आभार प्रदर्शन तर नेहा पाटील व संजना दुधाने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी गायत्री बजाज ,आदित्य हीवरे, स्वप्नील गोडसे ,जयश्री पाटील, विक्रांत रोडे ,खुशाल मानकर, आकांक्षा चांदेकर , कल्याणी पराळे, तारकेश्वरी सोनवणे,सागर सोनवणे , हर्षल चव्हाण , चेतना पाटील , निकिता बोरसे आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content