पिंपरूळ -आमोदा रस्ता अपघातातील जखमी महिलेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू

यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील पिंपरूळ -आमोदा रस्त्यावर दोन कारांची समोरासमोर झालेल्या भीषण अपघतात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला आहे.

यावल तालुक्यातील पिंपरूळ -आमोदा रस्त्यावर गुरूवार २ डिसेंबर रोजी दोन कारांची समोरासमोर झालेल्या भीषण अपघतात जखमी झालेल्या रेखा हेमंत नाईक (वय-४०) रा. रावेर यांचा उपचारादरम्यान रविवारी, दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी मृत्यू झाला आहे. अपघातातील हा दुसरा बळी आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, सावदा येथील सुपे कुटुंबिय लग्नाचे रिसेप्शनानिमित्ताने गुरुवारी दि.२ डिसेंबर रोजी सकाळी कार ( डीएल १० ए. ६१६५) ने जळगाव येथे येत असतांना पिंपरूळ – आमोदा दरम्यान समोरून येणारी इंडिका कार (एमएच १९ पी २६१२) यांच्यात यांच्या भीषण अपघात झाला होता.
या भीषण अपघातात भावना भरत सुपे (४०, रा.वाघोदा) यांचा जागीच मृत्यू झाला होता तर विद्या काशिनाथ सुपे व मुलगा कृष्णा भरत सुपे दोघे रा. मोठे वाघोदा ता. रावेर यांच्यासह इंडिका वाहनातील प्रवासी व रावेर येथील व्ही.एस.नाईक विद्यालयाचे चेअरमन यांच्या परीवारातील रेखा हेमंत नाईक (वय-४०), प्रतीक हेमंत नाईक (वय-२०), प्रीती हेमंत नाईक (18, रा.रावेर) असे पाच जण गंभीर जखमी झाले होते.या जखमीतील रेखा हेमंत नाईक यांचा रविवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमीतील एकाची प्रकृती गंभीर आहे

Protected Content