Home Cities जळगाव विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे भंगलेल्या मुर्त्यांचे केले विधीवत विसर्जन; मंदीरांची...

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे भंगलेल्या मुर्त्यांचे केले विधीवत विसर्जन; मंदीरांची केली स्वच्छता


जळगाव प्रतिनिधी । शहरातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी शहरातील ठिकठिकाणी परिसरातील मंदीरात स्वच्छता करून नगरीकांनी ठेवलेल्या भंगलेल्या मुर्त्यांची विधीवत मेहरूण तलवात विसर्जन करण्यात आले.

मंदीर स्वच्छ ठेवून भंगलेल्या मुर्त्यांची विटंबना होणार नाही याची काळजी घेवून मुर्त्या पाण्यात प्रवाहित कराव्यात असे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे करण्यात आले आहे. हरी भक्त पारायण योगेश महाराज कोळी यांनी सांगितले की, आपल्या परिसरात असलेल्या मंदीरातील स्वच्छता कायम ठेवावी, याठिकाणी कोणत्याही तुटलेल्या व फुटलेल्या मुर्त्यां ठेवू नये, तसेच परिसरात अशाप्रकारच्या मुर्त्यां मंदीरात आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दीपक दाभाडे यांने केले आहे.

मोहिम यशस्वितेसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे हभप योगेश महाराज कोळी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख शैलेंद्र ठाकुर, विश्व हिंदू परिषद महानगर उपाध्यक्ष हरीष कोल्हे, विश्व हिंदू परिषद महामंत्री दीपक दाभाडे, अथर्व सोनार, प्रशांत बारी, राजू कोळी, श्रीकांत कुले, भटु कोळी यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound