के.के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी जल्लोषात साजरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील के.के. इंटरनॅशनल स्कूल मध्ये बुधवारी २८ जून रोजी सकाळी आषाढी एकादशी अतिशय जल्लोषात साजरी करण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाळेच डायरेक्टर मनोज पाटील, सीमा पाटील तसेच शाळेच्या उपमुख्याध्यापिका मनीषा धबाडे यांच्याहस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विठ्ठलची आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे वेळी विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक पद्धतीने वेशभूषा साकारली होती. तसेच विठ्ठल व रुख्मीनीच्या वेशभूषेत विद्यार्थी आले होते. तसेच शाळेच्या शिक्षिका अनिता पाटील व छाया पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.

 

यानंतर शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांचे लेझिम पथक तसेच  विठू माऊलीच्या चिमुकल्या वारकरी  मुलांनी “विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला” या गाण्यावर पाऊली खेळत आनंद घेतला.  यावेळी विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला. संपूर्ण परिसरात अगदी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. अशाप्रकारे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Protected Content