डॉ.रितेश पाटील यांच्यातर्फे रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे ‘आर्सेनिक अल्बम ३०’ औषधांचे मोफत वाटप

जळगाव प्रतिनिधी । सध्या कोविड-19 या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमिओपॅथी गोळ्या नागरिकांना मोफत दिल्या जात आहेत, हे कार्य येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ.रितेश पाटील यांच्यातर्फे केले जात आहे.

केंद्रीय आयुष मंत्रालयाने मान्यता दिल्यानंतर या औषधी लोकांना देऊ शकतात त्यामुळे सामाजिक आत्मभान जपत विनामूल्य सेवा डॉ.पाटील हे देत आहेत. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे २ हजार, जळगाव महापालिका येथे ८०० , जिल्हाधिकारी यांना २ हजार तर पोलीस अधीक्षक यांना २ हजार गोळ्याच्या डब्या सुपूर्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे गेल्या पाच दिवसांपासून जो नागरिक येईल त्यास मोफत आर्सेनिक ३० या गोळ्या शिस्तबद्ध वातावरणात दिल्या जात आहेत.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कॉम्प्लेक्स येथील दवाखान्याच्या आवारात हा उपक्रम सुरू असून याचा लाभ सर्व स्तरातील महिला – पुरुष घेत आहेत. येणाऱ्याला सॅनिटाईझ केले जात असून सोशल डिस्टन्सिंगचे पालनही केले जात आहे .कोल्हापूर , सांगली येथे आलेल्या प्रचंड महापुराच्या प्रसंगीही डॉ.रितेश पाटील आणि सहकाऱ्यांनी तिथे प्रत्यक्ष जाऊन मदतीचा हात दिला होता व वैद्यकीय सेवा बजावली होती .ज्यांना ही हे औषध हवे असेल त्यांनी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहाप्रयन्त येऊन मोफत औषधी घेऊन जावे असे आवाहनही डॉ.पाटील यांनी केले आहे.. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे अनेकांनी स्वागत आणि कौतुक केले आहे.

Protected Content