नाहाटा महाविद्यालयातील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

WhatsApp Image 2020 01 13 at 6.54.40 PM

भुसावळ, प्रतिनिधी | येथील भुसावळ कला,विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे न्यू फ्रंटियर्स इन बॉयोलॉजीकल सायन्स एनएफ बीएस २०२० याविषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे दि.१३ रोजी आयोजन करण्यात आलेले होते. या परिषदेत सुमारे ११५ संशोधक प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

जीवशास्त्रातील नवीन विचार प्रवाह या विषयावर सखोल असे विवेचन उपस्थित संशोधकांनी केले. तसेच ४४ संशोधकांनी आपल्या शोधनिबंधांचे वाचन केले. परिषदेसाठी ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ अध्यक्ष डॉ.मोहन फालक , चेअरमन महेश फालक , कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा यांची उपस्थिती होती. परिषदेच्या अध्यक्षस्थानी सचिव विष्णु चौधरी हे होते. तसेच त्यांनी परिषदेचे उद्घाटन केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.मिनाक्षी वायकोळे, परिषदेसाठी वक्ते म्हणून प्रा. डॉ. पी. एस. लोहार ,डॉ. एस. ए. पाटील , परिषदेचे संयोजक उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच.बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी, उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे, सिनेट सदस्य  प्रा. ई. जी. नेहेते, डॉ.संध्या सोनवणे, डॉ.शिरीष झांबरे, डॉ. एस. आर. महाजन ,डॉ.एम.जी.पाटील, सहसंयोजक डॉ. डी. के. हिवराळे, संघटन सचिव डॉ.विद्या पाटील, संघटन सचिव डॉ. एम. जे. जाधव यांची उपस्थिती होती. परिषद एकूण चार सत्रात घेण्यात आली. प्रथम सत्रास प्रा.डॉ. पी. एस. लोहार यांचे बीजभाषणाने झाली. द्वितीय सत्र डॉ.एस. ए. पाटील यांच्या बीजभाषणाने झाले. तिसरे सत्रात संशोधक शोधनिबंधांचे वाचन तसेच पोस्टर प्रेसेंटेशन घेण्यात आले. पोस्टर प्रेसेंटेशनमध्ये प्रथम क्रमांक ज्योती अशोक पांडे, द्वितीय क्रमांक सुभद्रा एम. चावराई तर तृतीय क्रमांक राजश्री नरेंद्र पाटील यांना मिळाला. शोधनिबंध वाचनमध्ये प्रथम क्रमांक आनंद एस. जाधव, द्वितीय क्रमांक महेंद्रकुमार रमेश शिरसाठ यांना मिळाला. परिषदेचा समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व परिषदेचे संयोजक डॉ. एस. व्ही. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व अध्यक्षस्थानी डॉ. डी. एन. पाटील, डॉ.शिरीष झांबरे, डॉ. एस. आर. महाजन, डॉ. एम. जी. पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी सहभागी प्राध्यापक,संशोधक विदयार्थी यांना प्रमाणपत्र वाटप केले. समारोप समारंभाचे सूत्रसंचालन व आभार  प्रा. डॉ. एम. जे.जाधव यांनी मानले. या संपूर्ण परिषदेत परिषदेचे संयोजक उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, सहसंयोजक डॉ. डी. के. हिवराळे, संघटन सचिव डॉ. विद्या पाटील, संघटन सचिव डॉ एम. जे. जाधव, प्रा. ज्योती जंगले, प्रा. डी. एन. बोरीकर, प्रा.मोहिनी पाटील, प्रा. तुषार चौधरी, प्रा.देवेंद्र पाटील, प्रा. उमेश पाटील,प्रा. प्रशांत पाटील, प्रा. शंकर पाटील तसेच विभागातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेऊन परिषद यशस्वीरीत्यापार पाडली.

Protected Content