काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी मोतीलाल व्होरा यांची निवड

motilal 3223993908

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काहीही झाले तरी राजीनामा परत घेणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर, काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार हंगामी अध्यक्षपदी काँग्रेसचे सर्वात जेष्ठ सरचिटणीस मोतीलाल व्होरा यांची निवड करण्यात आली आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या घटनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे हंगामी अध्यक्ष हे केवळ काँग्रेस कार्यकारिणीच्या पुढील बैठकीपर्यंतच अध्यक्षपदावर राहणार आहेत. मोतीलाल व्होरा हे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

काँग्रेसचे नवनियुक्त हंगामी अध्यक्ष मोतीलाल व्होरा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींची मनधरणी करणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस कार्यकारणीच्या पुढील बैठकीत याबाबत चर्चा होईल, त्यावेळी मी राहुल यांनीच अध्यक्षपदाचा पदभार स्विकारावा अशी आग्रही मागणी करणार आहे, असेही व्होरा यांनी म्हटले आहे.

Protected Content