‘मी’पणा करणांचा फुगा फुटेल : महाजनांचा खडसेंना टोला !

पारोळा प्रतिनिधी । भाजप हा व्यक्तीनिष्ठ पक्ष नसून कुणाच्या जाण्याने भगदाड काय छिद्र देखील पडणार नसून ‘मी’पणा करणारांचा फुगा फुटेल अशा शब्दात माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांना टोला लगावला आहे.

येथील सेंट्रल बोहरा स्कूलमध्ये भाजपची महत्वाची बैठक झाली. याप्रसंगी पक्षाचे संघटनमंत्री विजय पुराणिक व माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्ष करण पवार व अन्य नेत्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आ. गिरीश महाजन यांनी चौफेर टोलेबाजी केली.

आ. गिरीश महाजन म्हणाले की, ते म्हणाले की, भाजप हा व्यक्तीनिष्ठ नव्हे तर विचारनिष्ठ पक्ष आहे. पक्षाने गेल्या ४० वर्षात बरेच काही दिले असतांना आता आपल्यावर अन्याय झाल्याचे रंगविण्यात आलेले चित्र हे खोटे आहे. कुणाच्या गेल्याने भगदाड काय छिद्र देखील पडणार नसून ‘मी’पणा करणारांचा फुगा फुटेल अशा शब्दात आ. गिरीश महाजन यांनी घणाघाती टीका केली.

Protected Content