यावल येथे हरभरा खरेदी केंद्राचे आ. शिरीष चौधरी यांच्याहस्ते शुभारंभ (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत हरभरा खरेदी केंद्र शूभारंभ १९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीत आमदार शिरीष चौधरी,  सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, पं.स. सभापती पल्लवी चौधरी यांचे शुभहस्ते काटापुजन व धान्य पुजन कार्यक्रम पार पडले. 

याप्रसंगी यावल कृउबा सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, उपसभापती उमेश प्रभाकर पाटील व संचालक पुंजो डिंगबर पाटील, संचालक सत्तार तडवी, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, मंडळ  पंचायत समीती सभापती पल्लवी चौधरी, मसाकाचे माजी जेष्ठ संचालक बारसु नेहते, कृउबाचे संचालक डॉ . नरेन्द्र कोल्हे ,आणी खरेदी उपाभिकर्ता विकास कार्यकारी सहकारी सोसायटी कोरपावली चेअरमन राकेश फेगडे व सर्व संचालक मंडळ, खरेदी विक्री संस्था  संचालक मंडळ, शिवसेनेचे शरद कोळी , संतोष खर्चे, पप्पु जोशी , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचीव स्वप्नील सोनवणे यांच्या उपस्थिती होती.

याप्रसंगी सर्वप्रथम हरभरा विक्रीचा क्रमांक लागलेल्या शेतकरी यांचे आ. शिरीष चौधरी यांच्याहस्ते स्वागत सत्कार करण्यात आले. या प्रसंगी शासन निर्देशीत कोवीड-१९ चे सर्व नियम सर्वाना पाळाण्यात येवुन हरभरा खरेदीचे शुभारंभ करण्यात आले आहेत असे  विकास कार्यकार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी या प्रसंगी सांगीतले.  दरम्यान नाफेडच्या हमीभाव हरभरा खरेदी केन्द्र अंतर्गत प्रथम ऑनलाईन १७५३ नोंदणी झालेल्या प्रत्येकी शेतकऱ्याच्या हरभरा खरेदीस प्राधान्य दिले जाणार असुन एका शेतकऱ्याकडुन अधिका अधिक२५क्विटंल हरभरा खरेदी करण्यात येणार असल्याची माहीती कोरपावली  विकास सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे पांनी दिली असुन , शासनाच्या वतीने महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशनच्या वतीने यावल तालुक्यातुन यंदा एकुण २५ हजार क्विंटल हरभरा खरेदीचा उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती फेगडे यांनी दिली .

https://www.facebook.com/508992935887325/videos/259239025833317

 

Protected Content