खामगावातील सर्व व्यापाऱ्यांना कोविड स्वॅब टेस्ट बंधनकारक

 

खामगाव, प्रतिनिधी । शहरातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता व्यावसायिकांना कोविड चाचणी करणे बंधनकारक केलेले असून व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करून घेतली नाही तर त्यांची दुकाने सील करण्यात येतील असा इशारा जिल्हाधिकारी यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे. 

खामगावातील व्यावसायिकांना व त्यांच्या दुकानामध्ये काम करणारे कर्मचारी यांनी कोविड चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोविड चाचणी न केल्यास व्यावसायिक प्रतिष्ठान सील करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. नगर परिषदेतर्फे व्यावसायिकांसाठी कोविड चाचणी कॅम्पचे उद्या शनिवार २० मार्च आयोजन करण्यात आले आहे. चाचणी करण्याकरिता नगरपरिषद शाळा क्रमांक ६ मध्ये आरोग्य विभागातर्फे कॅम्प होणार असून या सर्व व्यावसायिक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर परिषद मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांनी केले आहे. 

 

 

 

Protected Content