आमरण नि:स्वार्थी परोपकार हा वृक्षांचा सद्गुण मानवाने सदैव आचरणात आणावा – संजय वाघमारे

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी “आमरण नि:स्वार्थी परोपकार हा वृक्षांचा सद्गुण मानवाने सदैव आचरणात आणावा.” असे भावनिक आवाहन कॅलिग्राफर संजय वाघमारे यांनी वृक्षारोपण प्रसंगी मार्गदर्शन करतांना केले. नशिराबाद येथील कलाग्राम परिसरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वर्गीय कलाशिक्षक पुंडलिक घनःश्याम कुमावत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज रविवार दि .२१ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपणाप्रसंगी स्व.पी.जी.कुमावत प्रतिष्ठानचे अध्यक्ष कलाशिक्षक श्याम कुमावत, डॉ.कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे,न्यू इंग्लिश स्कुलचे एच.के.सावकारे, डि.एन.पाटील, प्रतिष्ठानचे सचिव आबा माळी मान्यवर उपस्थित होते. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी,जळगाव यांच्या सहकार्याने स्व.पी.जी.कुमावत प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

न्यू इंग्लिश स्कुलच्या इयत्ता २०२२ / २३ शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता १० वी विद्यार्थ्यांची शाळु मातीपासून गणपती बनवणे कार्यशाळेचे आयोजन स्वर्गीय कुमावत प्रतिष्ठान तर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम कुमावत यांनी केले होते. कार्यशाळेत कलाशिक्षक शाम कुमावत यांनी माती कोणती वापरावी,माती भिजवण्याच्या पद्धती, गणपती बनवण्याच्या कृती व तंत्र कुशल पद्धती, रंगलेपन, रंगसंगती यासंदर्भात प्रात्यक्षिकासह सखोल माहिती दिली. गणपती निर्मिती कार्यशाळेचा लाभ साठ विद्यार्थी विद्यार्थीनींनी घेतला.

सुजल राणे, रोहित बावणे या विद्यार्थ्यांतर्फे परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी डिंपल माळी, पायल वारके, दिव्या पाटील, अनुष्का कोष्टी, श्रावणी चरडे, छकुली करूले विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी स्वप्नील पाटील, मयूर गायकवाड, विशाल जैन व संतोष शिरसाळे यांनी सहकार्य केले.

Protected Content