वळणावर दुचाकी स्लीप झाल्याने दोघे जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली गावाजवळील वळणावर दुचाकी स्लीप झाल्याने अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरूण शेख मन्नोवर (वय-५१) आणि वसीम शेख अब्दुल रहेमान दोन्ही रा. नागदुली ता. एरंडोल हे दोन्ही मिस्तरी काम करताता. २८ मार्च रोजी रात्री ९ वाजता दोघेजण कामावरून नागदुली जाण्यासाठी दुचाकी (एमएच १० डीयू १५६०) वरून शिरसोली रस्त्याने जात होते. त्यावेळी दुचाकी वसीम शेख चालवित होता. दरम्यान शिरसोली गावाजवळील वळणावर अचानक वसीमचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी स्लीप होवून अपघात झाला. यात दोघेजण जखमी होवून दुचाकीचे नुकसान झाले होते. दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी बुधवारी ६ एप्रिल रोजी रात्री हरूण शेख मुन्नोवर यांच्या फिर्यादीवरून संशयित वसीम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक समाधान टहाकळे करीत आहे.

Protected Content