Home क्राईम नवीन बी.जे.मार्केट येथे ७१ वर्षीय वयोवृध्दाचा आकस्मात मृत्यू

नवीन बी.जे.मार्केट येथे ७१ वर्षीय वयोवृध्दाचा आकस्मात मृत्यू

0
105

जळगाव प्रतिनिधी । जाहिरात एजन्सीत काम करणाऱ्या ७१ वर्षीय व्यक्तीचा राहत्या घरात बाथरूमजवळ पडून मृत्यू झाल्याची घटना १८ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहितीनुसार त्रिलोचनसिंग किसनसिंग (वय-७१) रा. पंजाब ह.मु. नवीन बीजे मार्केट जळगाव हे आनंद मल्हारा कम्युनिकेशन यांच्या जाहिरात एजन्सीमध्ये डिजाइनिंगचे काम करतात. १८ मार्च रोजी त्रिलोचन हे घराबाहेर पडले नसल्यामुळे त्यांचे सहकारी यांनी नवीन बी.जे. मार्केटमधील राहत्या घरी आले. घराचा दरवाजा आतून बंद होता. घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारी गॅलरीतून घरात प्रवेश केला.  घरात पाहिले असता त्रिलोचनसिंग हे घरात बाथरूमजवळ मयत स्थितीत पडलेले होते. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे समजले नाही. याप्रकरणी आनंद मल्हारा यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound