श्री मनुदेवी मंदिर संस्थानतर्फे आदीवासी गरजू महीलांना वस्त्र वाटप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल  तालुक्यातील सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनास खान्देशातील आलेल्या हजारो भाविकांनी दहा दिवस आई मनुदेवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली, या नवरात्रोत्सवाच्या काळात मनुदेवीच्या चरणी असंख्य महिला भाविकांनी शेकडो साड्या अर्पण केल्या होत्या. यातील असंख्य साड्या जवळ असलेल्या मानापुरी या आदिवासी वस्ती वरील रहिवासी असलेले गरजु व गरीब कुटुंबातील महिलांना वस्त्रदान म्हणून वाटप करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे आयोजन मानापुरी या आदिवासी वस्तीवर सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान आडगाव व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय जळगाव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त आर. एम. ठवरे यांच्या प्रमुख हस्ते असंख्य गरीब व गरजु महिलांना वस्त्रदान करण्यात आली. यावेळी धर्मदाय कार्यालय अधिक्षक राजु पाटील , निरिक्षक अनिल चौधरी , लघुलेखक किशोर बच्छाव, मनुदेवी संस्था अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव निळकंठ चौधरी, खजिनदार सोपान वाणी, विश्वस्त सतीश  पाटील, नितीन पाटील, चिंधु  महाजन, ज्ञानेश्वर पाटील, सुनिल महाजन, भुषण चौधरी, योगेश पाटील, चंदन वाणी, पिक महेन्द्र पाटील व मानापुरी येथील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

Protected Content