रावेर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अप डाऊनमुळे रुग्णांची हेळसांड

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  रावेर शहरातील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अप डाऊनमुळे तसेच वेळेवर येत नसल्याने रुग्णांची मोठी अडचण निर्माण होत आहे. याकडे  जिल्हा शल्यचिकित्सकांनी  लक्ष देण्याची मागणी रुग्णांकडून केली जात आहे.

 

रावेर ग्रामीण रूग्णालयात तालुक्यातील रूग्ण मोठ्या प्रमाणावर येत असतात. परंतू येथील अधिकारी कर्मचारी, काही परिचारीका व शिपाई सोयीच्या ठिकाणावरून अपडाऊन करत असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. ग्रामीण रूग्णालयाने आखून दिलेल्या नियम व वेळेची चांगलीच पायमल्ली केली जात आहे. याकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. मुक्ताई नगरचे वैद्यकीय अधिकारी श्री. राणे यांच्याकडे येथील ग्रामीण रुग्णायचा प्रभारी चार्ज आहे. परंतु श्री. राणे येथून मुक्ताई नगरला जाताच येथील काही लोक फक्त हजेरी लावण्यासाठी येतात. दुपारी तीनच्या आधीच येथून गायब होऊन जातात. या प्रकाराकडे वरिष्ठ वैद्यकीय अधिका-यांनी लक्ष देण्याची तसेच येथे बायोमॅट्रीक मशीन लावण्याची मागणी होत आहे.

 

Protected Content