ताडजिनसी येथील आदिवासीचे घर आगीत जाळून खाक

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील ताडजिनसी शिवारातील एका आदिवासीच्या घराला लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून यात एका गाय ठार झाली असली तरी दोन्ही बालके शेजारी झोपलेली असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

याबाबत वृत्त असे की, जिन्सी शिवारातील ताडजिन्सी येथील गट न १०४ या शेतात राहत असलेला चामरसिंग माठ्या भिलाला हे पत्नी दुसर्‍याच्या शेतात कामासाठी गेलेले होते. यातच त्यांच्या घराला आग लागली. त्याची ४ व ५ वर्षांची दोन्ही मुले घरापासून थोड्या लांब अंतरावर असलेल्या शेजार्‍याकडे झोपलेली होती. त्यामुळे ती सुदैवाने वाचली आहेत. रविवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक चामरसिंगच्या घराला आग लागून आगीत संपूर्ण घर व संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे याच ठिकाणी दोन गाई व दोन बैल बांधलेले होते. मात्र आगीच्या झळा लागल्याने बैलांनी व एका गायीने दोर तोडल्याने ते वाचले असून एका गाय आगीच्या भक्षस्थानी पडल्याने ठार झाली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content