कोरोना : माझे पहिले पेन्शन प्रधानमंत्री निधीला समर्पित- माजी आमदार हरीभाऊ जावळे

रावेर प्रतिनिधी । राज्यासह देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विविध सामाजिक संस्था त्यांच्या पातळीवर पंतप्रधान राहत कोष आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी दानशुर व्यक्तींनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने माजी आमदार हरीभाऊ जावळे यांनी आपले पहिले पेन्शनची रक्कम प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोषसाठी समर्पित केली आहे. या निधीच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त कुटुंबापर्यंत जास्तीत जास्त मदत पोहचविण्यास मदत होणार आहे.

माजी आमदार जावळे यांनी सांगितले की, जगभरात करोनाने हाहाकार माजवला आहे. या करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, प्रशासन, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस, गरजेच्या सुविधा पुरविणारे शासकीय कर्मचारी, माहिती प्रसिध्दी प्रतिनिधी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. ह्या लढ्यासाठी मी आज माझे पहिले पेंशन प्रधान मंत्री राष्ट्रीय राहत कोष साठी समर्पित केले असून कोषच्या बँक खात्यात जमा केले.

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विविध सामाजिक संस्था त्यांच्या पातळीवर या कुटुंबापर्यंत जास्तीत जास्त मदत पोहचविण्याचा योग्य तो प्रयत्न करतच आहे. पण ज्या कुटुंबापर्यंत अजूनही मदत पोहोचली नसेल त्या कुटुंबाच्या पाठीशी या प्रसंगी उभ राहण हे प्रत्येक सवेंदनशील व्यक्तिचे कर्तव्य आहे.

जिल्ह्यात असे कुटुंब किंवा भुकेला असलेले व्यक्ती नजरेस पडल्यास अश्या व्यक्तींना शक्य होईल तेवढी मदत करावी. गरज पडल्यास तालुक्यातील भाजपा तालुकाध्यक्षांशी संपर्क साधावा. सबंधित तालुक्यातील तालुकाध्यक्ष गरीब आणि गरजू कुटुंबापर्यंत योग्य ती मदत तात्काळ पोहचवतील. तसेच गरजूंना मदत करतांना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि समाजाला सुरक्षित ठेवावे असे आवाहन भाजपाचे पदाधिकाऱ्यांसह विविध संघटनांना केले आहे.

Protected Content