भुसावळच्या ग्रामीण रूग्णालयात किमान क्वॉरंटाईनची व्यवस्था तरी हवी ! : डॉ. नि. तु. पाटील ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कोविडग्रस्त रूग्णांना आता भुसावळ येथे कोणताही उपचाराची व्यवस्था नाही. या पार्श्‍वभूमिवर, लक्षणे नसणार्‍या रूग्णांसाठी ग्रामीण रूग्णालयात किमान क्वॉरंटाईन सेंटर तरी सुरू करावे अशी मागणी भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेल्या निर्देशानुसार आता भुसावळातील सर्व कोविड केअर सेंटर्स बंद करण्यात आले आहेत. यामुळे आता भुसावळ तालुक्यातील रूग्णांना जळगाव येथे जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या पार्श्‍वभूमिवर, भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी किमान लक्षणे नसलेल्या रूग्णांसाठी तरी ग्रामीण रूग्णालयात व्यवस्था असावी अशी मागणी केली आहे. यासोबत कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

खालील व्हिडीओत पहा डॉ. नि. तु. पाटील यांनी केलेल्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3630651656994055

Protected Content