धक्कादायक : मृत कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील पाच जण कोरोना पॉझेटिव्ह

जळगाव (प्रतिनिधी) अमळनेर येथील कोरोना पॉझिटीव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझेटिव्ह आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. रुग्णांची संख्या आता ११ वर पोहचल्यामुळे जळगाव जिल्हा रेड झोनच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.

येथील कोविड रुग्णालयातून कोरोना संशयित म्हणून स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व्यक्तींपैकी पाच व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहे. या पाचही व्यक्ती यापूर्वी कोरोना बाधित आढळून आलेल्या अमळनेर येथील मृत महिलेच्या कुटूंबातील आहे. यामध्ये 4 पुरुष व एक महिलेचा समावेश असून हे सर्व पुरुष 27 व 28 वर्षीय तर महिला 36 वर्षीय आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

अमळनेर येथील महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. या महिलेच्या पतीसह तिच्या संपर्कात आलेल्या सात जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. संपर्कात असणार्‍या सातही जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आले होते. परंतू आज या महिलेच्या संर्पकातील पाच जणांचा अहवाल कोरोना पॉझेटिव्ह आले आहेत. यामुळे जळगाव जिल्हा रेड झोनच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.

दरम्यान, दिनांक २० ते २२ एप्रिल या कालावधीत कोविड-१९ रूग्णालय, जळगाव येथे घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रूग्णांपैकी ८ व्यक्तींच्या स्वॅबचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले होते. निगेटिव्ह आढळून आलेल्या व्यक्तीपैकी तीन व्यक्ती ह्या अमळनेर येथील कोरोना बाधित महिला रूग्णाच्या संपर्कातील होते. तर मुंगसे येथील पॉझिटीव्ह महिलेवर उपचार सुरू असतांना मृत झालेल्या महिलेसह तिच्या पतीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने अमळनेरातील दगडी दरवाजा परिसर सील करण्यात आला होता.

Protected Content