Home Cities जळगाव चंद्रशेखर अत्तरदे यांची पाळधी येथे प्रचार रॅली

चंद्रशेखर अत्तरदे यांची पाळधी येथे प्रचार रॅली


attarde rally

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मतदार संघातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी आज (दि.१४) पाळधी येथे प्रचार रॅलीसह झंझावाती प्रचार दौरा केला. यावेळी गावातील महिलांनी जागोजागी त्यांचे औक्षण करून व फुलहार घालून स्वागत व सत्कार केला. यावेळी पाळधी-चांदसर गटातील सुमारे १०० नागरिकांनी स्व-खर्चाने स्वतःचे ट्रॅक्टर तर सुमारे ५०-६० चारचाकी वाहने आणून रॅलीही काढली.

 

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष. पी.सी. आबा पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील, माजी कृ.उ.बा.स. सभापती लकी ण्णा उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील तसेच भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस राकेश नन्नवरे, जळकेकर महाराज, नांदेड-साळवा-बांभोरी गटातील शक्तिप्रमुख प्रकाश ठाकुर, कडू धनगर, बूथ प्रमुख ललित शिंपी, किशोर माळी, राधेशाम माळी, रामलाल ठाकरे, राकेश धनगर, सनी ठाकुर, दीपक कोळी, संदेश झवर, हितेंद्र पाटील, दीपक पाटील, सचिन शिंपी, रफिक पिंजरी तसेच गटातील बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, पेज प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound