अर्नब गोस्वामी वर तत्काळ गुन्हे दाखल करा : देवेंद्र मराठे

 

जळगाव, प्रतिनिधी । रिपब्लिक टीव्ही चॅनल चे संपादक अर्नब रंजन गोस्वामी यांने काल आपले टीव्ही चॅनलच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सोनिया गांधी यांच्याबद्दल अपमानजनक बेताल वक्तव्य केले त्या वक्तव्याचा जळगाव जिल्हा एनएसयूआयतर्फे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जाहीर निषेध नोंदविला.

एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या ई-मेलचा आशय असा की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाला जगातील सगळ्यात मोठे संविधान दिले. त्या संविधानाच्या अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अर्णब गोस्वामी यासारखे माथेफिरू आपल्या अधिकारांचा गैरवापर करून एका महिला लोकप्रतिनिधी बद्दल अपमानजनक एकेरी भाषेतील बेताल वक्तव्य करतात. अशा लोकांमुळे संपूर्ण पत्रकारितेचा दर्जा खराब होतो. अर्नब गोस्वामी याच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक संतापाची लाट निर्माण झालेली आहे. संपूर्ण देश कोरोणासारख्या संसर्गजन्य आजारामुळे अतिगंभीर परिस्थितीमधून मार्गक्रमण करीत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या कर्तव्याची जाण ठेवून व देशांमध्ये कुठल्याही प्रकारचे वातावरण खराब होणार नाही याचे भान अर्णब गोस्वामी यासारख्या माथेफिरूने नेहमी ठेवले पाहिजे. जळगाव जिल्हा एनएसयूआयतर्फे आज ई-मेलद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व तथा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना एका पत्रकाद्वारे अर्णव गोस्वामी याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व या संपूर्ण षडयंत्रामागे नेमकं कोण आहे ? याचीही कसून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे.

Protected Content