दोन गटांमध्ये हाणामारीत हवेमध्ये गोळीबार ? : पोलिसांचा तपास सुरू

जळगाव प्रतिनिधी । शहरात क्रिकेटच्या वादातून झालेल्या धुमश्‍चक्रीमध्ये एका तरूणाने हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर आली असून पोलीस प्रशासनाने याबाबत रात्री उशीरापर्यंत चौकशी केल्याचे वृत्त आहे.

याबाबत वृत्त असे की, शिवाजीनगर परिसरातील उस्मानिया पार्कजवळ धनाजी काळे नगराच्या समोरील शेतात तरूण क्रिकेट खेळत असतांना बाजूला काही जण दारू पित होते. त्यांच्यात वाद झाल्यानंतर दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तर या हाणामारीवेळी एका तरुणाने मद्याच्या नशेत बंदुकीतून तीन राऊंड हवेत फायर केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांना घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, येथे तरूणांच्या दोन गटांमध्ये वाद झाला असला तरी गोळीबार झाल्याची माहिती मिळाली नसल्याचे डॉ. रोहन म्हणाले.

Protected Content