वाहक सोनवणे यांनी त्यांचे महिन्याभराचे वेतन केले प्रधानमंत्री कोषात जमा

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील एसटी महामंडळातील वाहक मनोज प्रकाश सोनवणे (वाहक २८५४०) यांनी कोरोना निधीला एक महिन्याचे संपूर्ण वेतन २५०००/- रुपये सुपूर्द केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जळगाव आगाराचे मनोज सोनवणे यांनी सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. तेथील कर्मचारी श्री लाडवंजारी यांनी पी. एम. फंडासाठी दिलेला चेक स्वीकारण्यास नकार दिल्याने श्री. सोनवणे यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट बँकेशी संपर्क साधला. त्यानुसार एसटी महामंडळातील संपूर्ण एक महिन्याचा पगार पी. एम. केयर कोरोना फंडाला दान दिलेत. याप्रसंगी एसटी बँकेचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप सूर्यवंशी, शाखा व्यवस्थापक बी. आर. धनजे यांनी धनादेशचा स्वीकार करून सदर रक्कम प्रधानमंत्री कोषात जमा केली. याप्रसंगी विविध संघटनांचे पदाधिकारी आर. के. पाटील, गोपाळ पाटील, विनोद शितोळे, मनोहर मिस्त्री, प्रभाकर सोनवणे आदींनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. यापूर्वीही श्री. सोनवणे यांनी त्यांच्या परिसरातील कोरोना विरोधातील लढाईत त्यांनी स्वखर्चाने सेनीटायझर व अन्नदान करण्याचा संकल्प सिद्धीस नेलेला आहे. त्यांच्या या कार्यास एसटी कर्मचाऱ्यांकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन केले. याप्रसंगी वाहक मनोज सोनवणे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील प्रवाशी जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि या एसटीने देखील आम्हास नेहमीच बहुजन हिताय हा संदेश शिकविला असल्याने ही रक्कम मदत म्हणून देतांना आनंद होत आहे.

Protected Content