‘रेडक्रॉस’च्या कम्युनिटी किचनला पालक मंत्र्यांनी भेट देऊन केले कौतुक

 

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत काम नसल्याने हातावर पोट असणाऱ्या गरजुंना उपाशी पोटी राहावे लागत आहे. या गरजूंसाठी अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज  अचानक रेडक्रॉसच्या किचनला भेट देऊन कौतुक केले.

कोरोनाचा विषाणू विरोधात डॉक्टर्स,नर्सेस, पोलीस, अग्निशमन यंत्रणा, स्वच्छता दूत, प्रशासन आणि मानवता धर्म जोपासणाऱ्या सेवाभावी संस्था जीवाची बाजी लावून लढा प्राणपणाने लढताहेत. लॉकडाऊन काळात जे लोक निराधार, निराश्रित व गरजू आहेत,त्यांना दोन वेळचे पौष्टीक व पोषणयुक्त जेवण देण्यासाठी रेडक्रॉसने कम्युनिटी किचनचा उपक्रम श्री ओसवाल सेवा संघाच्या सहकार्याने सुरू केलेला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच समाजातील अनेक आश्रयदात्यांनी या उपक्रमास मदत करत आहेत. यामुळे रोज सुमारे २५०० उपाशी लोकांच्या पोटात अन्नाचे दोन घास जात आहेत. रेडक्रॉसच्या या उपक्रमाबद्दल माहिती कळताच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज अचानकपणे रेडक्रॉसच्या कम्युनिटी किचनला भेट देऊन या उपक्रमाच्या कामकाजाची कार्यपध्दती जाणून घेतली. संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनासोबतच रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, रक्त पेढी चेअरमन प्रसन्न कुमार रेदासनी, सहसचीव राजेश यावलकर, प्रथमोपचार व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक घन:शाम महाजन, अनिल कांकरीया व अन्य पदाधिकारी ह्या उपक्रमाचे अत्यंत शिस्तबध्दपणाने नियंत्रण करीत आहेत. रेडक्रॉस बरोबरच असंख्य आश्रयदाते, स्वयंसेवक व प्रशासनातील सहभागी अधिकारी यांच्या या सेवाकार्याचं पालक मत्र्यांनी समाधान व्यक्त करून कौतुक केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव विनोद बियाणी, या उपक्रमाचे अत्यंत शिस्तबद्धरीत्या संयोजन करणारे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुभाष सांखला, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा आणि स्वयंसेवक उपस्थित होते.

Protected Content