Home क्रीडा सावदा येथील जिज्ञासाची धनुर्विद्येत सिल्व्हर कामगिरी

सावदा येथील जिज्ञासाची धनुर्विद्येत सिल्व्हर कामगिरी

0
74

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थींनी जिज्ञासा भारंब हिने सीबीएसइ साउथ झोन धनुर्विद्या स्पर्धा   24 ते 26 ऑक्टोबर 2023 दरम्यान चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल अहमदनगर येथे झालेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

तिच्या उल्लेखनिय कामगिरीमुळे  डेहराडून उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सध्या ती प्रशिक्षक अमर जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्येचा नियमित सराव करत असते. तसेच तिला धनुर्विद्या खेळाडू निशांत राठोड, ओम कोळी यांचे वारंवार मोलाचे मार्गदर्शन मिळत असते. तिच्या यशासाठी गोदावरी फौंडेशन चे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील तसेच शाळेच्या प्राचार्या भारती महाजन, प्रशिक्षक अमर जाधव सर असलम सर, व वसीम सर  यांनी तिचे अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound