जुन्या वादातून दोन जणांना बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून जळगाव तालुक्यातील आसोदा येथे दोन जणांनी लाकडी काठीने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता चार जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, प्रकाश पुरूषोत्तम सपकाळे (वय-४२) रा. आसोदा ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता प्रकाश सपकाळे आणि त्यांचा पुतण्या अर्जून सपकाळे यांच्यासोबत जुन्या वादातून गावातील महेंद्र अशोक रायसोनी, आण्णा अशोक रायसोनी, सागर सपकाळे आणि अजय सपकाळे सर्व रा. आसोदा ता.जि.जळगाव यांचा वाद सुरू होता.

त्यावेळी प्रकाश सपकाळे आणि ईश्वर कोळी हे भांडण सोडविण्यासाठी गेले. याचा राग आल्याने चौघांनी लाकडी काठ्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी प्रकाश सपकाळे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी महेंद्र अशोक रायसोनी, आण्णा अशोक रायसोनी, सागर सपकाळे आणि अजय सपकाळे सर्व रा. आसोदा ता.जि.जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे करीत आहे.

Protected Content