भोंगऱ्या उत्सवाला सुरूवात; आदिवासी पाड्यावर समाज बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदिवासींसाठी आनंदाची पर्वणी असलेल्या भोंगऱ्या उत्सवाची सातपुड्याच्या कुशीत अतिदुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी पावरा समाज बांधवांच्या वतीने अनेक वर्षांची पारंपारिक पद्धीने साजरा होणाऱ्या भोंगऱ्या उत्सव बाजाराची यावर्षी देखील मोठ्या उत्साहात सुरूवात करण्यात आली.

आदीवासी समाज बांधवांच्या वतीने पारंपारिक आकषर्क वस्त्र परिधान करुन विविध लोकगीतांच्या सुमधुर संगीतावर नृत्य करीत उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सातपुडा पर्वताच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासीं बांधवांच्या वतीने यावल तालुक्यातील दहिगाव येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या मोहराळा ग्रा.पंचायत अंतर्गत जामुनझिरा गावठाण या पाड्यावर दोन दिवासींचा भोंगर्‍या बाजार मोठ्या उत्साहात आदिवासी समाजाच्या रीतिरिवाजा प्रमाणे विविध नृत्यांनी पार पडला.

या बाजारात महाराष्ट्रातील व शेजारच्या मध्यप्रदेश राज्यातील गावपाड्यावर वास्तव्यास असलेले आदिवासी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या भोंगऱ्या बाजारात विविध पाड्यांवरील आदिवासींनी आपापले पथके आणुन बासरीवादन ढोलवादनाव विविध साहित्याने विविध नृत्याविष्कार या भोंगऱ्या बाजारात आणुनआपआपल्या टोळयांसह तरूण व तरूणी या लोकगीत गायक करीत आदीवासी समाजाच्या सांस्कृतीक पध्दतीने आकर्षक नृत्य करीत या भोंगाऱ्या उत्सवाचा आनंद लुटला.

होळीच्या पहिल्या आठवड्यात देवाच्या निमित्ताने भोंगर्‍या बाजार पारंपारिक पद्धतीने भरविला जात आहे या विविध नृत्य करीत आदिवासींनी विविध वेशभूषा करून आनंद लुटला यात फुटाणे हार कंगन मोठ्या प्रमाणात विक्री केली जात होती तर आदिवासी महिला आणि पुरुषांनी विविध प्रकारचे फोटोग्राफी काढलेत पारंपारिक पद्धतीने नुसार सातपुडा पर्वताच्या रांगेतील नागादेवी, वाघझिरा, अंबापानी, चिंचपाडा, गायरान वडगव्हाण, लहसुनबर्डी वड्री धरणसह बहुसंख्य पाड्यांवरील आदिवासी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भोंगऱ्या बाजाराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी डी.पी. साळुंखे, शशी पाटील, विक्रम महाजन, ललित पाटील, अनिल साठे, भरत महाजन, विजय पाटील, शामराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दहिगाव उपसरपंच देविदास पाटील यांच्यासह बिलालसिंग पावरा, जगदीश बारेला, जहांगीर तडवी, रमा महाराज, सबरसिंग बारेला, कुमसिंग बारेला, रेंजला बारेला, आसाराम बारेला, प्रेमसिंग बारेला, भावसिंग बारेला, हरी बारेला आदी उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी अरुणभाई गुजराथी यांनी आदिवासी समाज बांधवांचे कौतुक करीत त्यांच्या भावना जाणून घेतल्या कार्यक्रमाच्या आयोजन जग्गा बारेला यांच्या नेतृत्वाखाली समस्त पंच कमिटी जामुनझिरा यांनी केले होते.

Protected Content